स्वास्थ्य दर्पण प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना दिनांक 6.12. 2007 रोजी झाली यापूर्वी लाईफ लाईन हेल्थ रिसर्च या संस्थेच्या माध्यमातून सण 1999 सालापासून सामाजिक कार्यास सुरुवात केलेली आहे.2000 साली एच. आय. व्ही. बाधित रुग्णाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अतिशय विकृत असा होता. अशावेळी संस्थेच्या माध्यमातून मानव्य प्रकल्पाची स्थापना करून या प्रकल्पाच्या माध्यमातून एड्सग्रस्त रुग्णांची सेवा व देखभाल संस्थेने अनेक वर्ष केली.या संस्थेच्या मानवतावादी कामास शासन स्तरावर तसेच विविध सामाजिक स्तरावर अनेक पुरस्कार संस्थेस प्राप्त झाली.
स्वास्थ्य दर्पण आरोग्य मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी प्रकल्पांना आरोग्य मासिक स्वास्थ्य दर्पण पुरविण्याची जबाबदारी संस्थेने सण 2009 ते 2014 या पाच वर्ष समर्थपणे पेलली .या पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात संस्थेचे कार्य पोहोचले
मागास क्षेत्र अनुदान निधी या केंद्र शासनाच्या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्य व गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी यशदा पुणे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर यांनी सोपवली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कर्जत जामखेड संगमनेर कोपरगाव अकोले या तालुक्यातील प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य संस्थेने सुमारे पाच वर्ष पूर्ण केले तसेच या प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे वाचन साहित्याची निर्मिती देखील संस्थेने केली या वाचन साहित्याची दखल राज्य सरकार तसेच यशदा पुणे यांनी घेतली या प्रशिक्षणाच्या माध्यमातून संस्थेचे कार्य गाव पातळीवर माहित झाली. कामाचा सारांश असणारी एक फिल्म बी आर जी एफ यशदा या नावाने यू ट्युब यावर उपलब्ध आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक ग्रामपंचायती तपासण्याची जबाबदारी शासनाने समस्येवर सोपवली होती यामध्ये देखील संस्थेने ODF ग्रामपंचायती तपासणीसाठी संस्थेने सहभाग नोंदविला.
भूजल सर्वेक्षण विभाग अंतर्गत अनेक उपक्रमात संस्थेने सहभाग दिला आहे तसेच वसुंधरा पाणलोट कृषी विभाग यांच्यासमवेत अनेक संयुक्त उपक्रम संस्थेने पूर्ण केलेले आहेत शहर स्वच्छता अभियान निर्मल भारत अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान पैसा बाल चित्र समिती भारत सरकार अहमदनगर जिल्हा परिषद सामाजिक न्याय विभाग नेहरू युवा केंद्र भारत सरकार अशा अनेक शासकीय व शासकीय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा संस्थेने १९९९पासून घेतला आहे व हा वसा पुढे चालवण्याचे कार्य निरंतर चालू आहे.